मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येत असून या महामोर्चाच्या आधी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांचा शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा या निवासस्थानी ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय
मात्र या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.