पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबई कायदा व सुव्यवस्था अप्पर पोलीस महासंचालक पदी बदली झाली आहे. आज मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपला पदभार नवनिर्वाचित पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना हस्तांतरित केला आहे.
गृह विभागाने मंगळवारी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.