पुणे : पुण्यातील एका महिलेला लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर शून्य टक्के व्याज लावून 50 लाख रुपयांच आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी अडीच लाख रुपयांना गंडा घातला होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलीस पथकाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तपासाअंती पुणे पोलिसांनी मुलुंड येथे जाऊन या कॉल सेंटरवर छापा घातला आहे.
याप्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. घटनास्थळावरून लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईल फोन, सिम कार्ड हे साहित्य जप्त करण्यात आला असून या कॉल सेंटरमध्ये 40 तरुण-तरुणी देशभरामध्ये लोकांना फोन करून लाखो रुपयांचा गंडा घालत असल्याच निष्पन्न झाला आहे.