सांगली : सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोड प्रकरणी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पूजा चव्हाणवर अन्याय झाला तेव्हा का आवाज उठवला नाही ? असा सवाल उपस्थित करून या प्रकरणात राठोड यांना क्लीन चिट तात्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. पक्ष कोणताही असो मी लढणारी महिला आहे. लढायचे मी कधीच सोडणार नाही असे यावेळी त्या म्हणाल्या आहेत.
मंत्री संजय राठोड यांच्यावरील माझा लढा पूर्वी रस्त्यावरचा होता. आता न्यायालयीन स्तरावर सुरू असून याचिकेवरील सुनावणी अजून सुरू आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अशी भूमिका यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मांडली आहे.