शाळेत मोबाईल घेऊन जाण्यास आईने दिला नकार ; मुलाने उचलले थेट असे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

509 0

खरगोण : मध्य प्रदेश मधील खरगोण येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरगोण येथे एका नववित शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आईने शाळेत जाताना मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने असे टोकाचे पाऊल उचलले.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, पीडब्लूडी विभागात काम करणारे राजेश शर्मा खरगोन मुख्यालयापासून 80 किमी दूर बडवाह पोलीस ठाण्याअंतर्गत आपल्या कुटुंबासह राहत होते. राजेश यांचा 13 वर्षाचा मुलगा प्रकाश नववी इयत्तेत शिकत होता.राजेश शर्मा यांचा मुलगा प्रकाश चार दिवसापूर्वी शाळेत जाण्यास निघाला. यावेळी तो आपल्या आईकडे मोबाईल मागत होता. मात्र शाळेत मोबाईल घेऊन जाण्यास आईने नकार दिला. त्यानंतर तो घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला.

काही वेळाने आई त्याला मोबाईल देण्यासाठी शाळेत गेली, पण प्रकाश शाळेत आलाच नव्हता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडून आला नाही. म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ४ दिवसांनंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडला. कुटुंबीयांनी मुलाच्या कपड्यांवरून मुलाची ओळख पटवली. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!