PUNE CRIME : स्वच्छतागृहात तरुणीचा मोबाईलद्वारे काढला व्हिडिओ; पुण्यातील आयसरमधील धक्कादायक घटना; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

666 0

पुणे : पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका स्वच्छतागृहामध्ये २६ वर्षीय तरुणीचा मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीने चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित तरुणी ही आयसर पाषाण येथे एका विभागामध्ये काम करत असून ऑफिसमधील स्वच्छतागृहामध्ये असताना तिचा व्हिडिओ मोबाईल मधून चित्रात करण्यात आला. स्वच्छतागृहातीलच शेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहातून अज्ञात आरोपीने हा व्हिडिओ चित्रित केला असल्याचं समजत आहे. या अज्ञात आरोपीने शौचालयाच्या खाली असणाऱ्या मोकळ्या जागेतून मोबाईल सरकवला आणि अशा पद्धतीने व्हिडिओ चित्रित केला. अशी माहिती या तरुणीने पोलिसांना सांगितली आहे. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. तिच्या आरडाओरड्याने आरोपी तिथून पळून गेला. यानंतर या तरुणीने चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा तपास सुरू केला आहे.

Share This News
error: Content is protected !!