महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बैठकस्थळी पोहचले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मुख्यमंत्री मांडणार बाजू

180 0

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या मुद्द्यावर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून, अमित शहा यांच्या संसदेतील कार्यालयात ही बैठक पार पडते आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बैठकस्थळी पोहचले आहेत. थोड्याच वेळात संसदेतील दालनात होणार बैठक सुरू होईल.

दरम्यान या वादामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीने काही तोडगा निघतो का? हे लवकरच समजेल. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात असून यावर दोन्हीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नक्की कोणता प्राथमिक तोडगा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!