शाईफेक प्रकरणातील मनोज गरबडेसह दोघांना जामीन मंजूर; पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष

415 0

पिंपरी चिंचवड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर समर्थकांनी पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार जल्लोष केला आहे. या तिघांनाही हार घालून ढोल ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला.

पिंपरीमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक करण्यात आली होती. महात्मा फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्यावरून त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर शाहीफेक करण्यात आली. परंतु यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे कलम 307 देखील लावण्यात आला होता. यावरून राज्यभर टिकेची झोड उठली होती. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कलम मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता या तिघांना पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!