मोठी बातमी : पुणे पोलीस आयुक्त पदी रितेश कुमार तर विनय कुमार चौबे पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त

1099 0

पुणे : पुणे गृह विभागाने नुकत्याच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे देखील बदलीचे आदेश आले असून आता पुणे पोलीस आयुक्त पदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या जागेवर आता विनय कुमार चौबे हे पदभार स्वीकारतील.

 

राज्य पोलीस दलातील 30 वर्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या आज गृह विभागाने बदल्या केल्या आहेत यामध्ये पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्यासह,

1. मधुकर पांडे : अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे महाराष्ट्र राज्य मुंबई ते पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार

2. प्रशांत बोर्डे : अपर पोलीस महासंचालक आणि मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा मुंबई ते अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे

3. सत्यनारायण चौधरी : विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई ते पोलीस सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था बृहन्मुंबई

4. नितीश मिश्रा : विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई ते पोलीस सह आयुक्त आर्थिक गुन्हे बृहन मुंबई

5. प्रवीण पडवळ : पोलीस सह आयुक्त आर्थिक गुन्हे गृहन्मुंबई ते पोलीस सह आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई

6. लखमी गौतम : विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई ते पोलीस सह आयुक्त गुन्हे बृहन्मुंबई

7. एस. जयकुमार : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालय मुंबई ते पोलीस सह आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई

8. अंकुश शिंदे : पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड ते पोलीस आयुक्त नाशिक शहर

9. प्रवीण पवार : संचालक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र कोकण

10. सुनील फुलारी : विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक

11. अनिल कुंभारे : अप्पर पोलीस आयुक्त संरक्षण आणि सुरक्षा बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई

12. परमजीत दहिया : पोलीस उप महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई ते अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई

13. विनायक देशमुख : अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ते अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई

14. राजीव जैन : अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई ते अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई

15. सदानंद दाते : पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार ते अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई

16. विश्वास नांगरे पाटील : सह पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था बृहन्मुंबई ते अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई

17. मिलिंद भारंबे : विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई ते पोलीस आयुक्त नवी मुंबई

18. राज वर्धन : सह पोलीस आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई ते अपर पोलीस महासंचालक व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई

19. विनय कुमार चौबे : अप्पर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई ते पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड

20. अमिताभ गुप्ता : पोलीस आयुक्त पुणे शहर ते अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई

21. अनिकेत कौशिक : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई

22. शिरीष जैन : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते सहआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई

23. संजय मोहिते : विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य

पोलीस उप महानिरीक्षक

24. नवीन चंद्र रेड्डी : अप्पर पोलीस आयुक्त नागपूर शहर ते पोलीस आयुक्त अमरावती शहर.

25. आरती सिंह : पोलीस आयुक्त अमरावती शहर ते अपर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस बृहन्मुंबई

26. नामदेव चव्हाण : अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर ते पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे

27. निसार तांबोळी : पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड ते अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई

28. ज्ञानेश्वर चव्हाण : अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ते अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे बृहन्मुंबई

29. रंजन कुमार शर्मा : पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे ते अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई

30. रितेश कुमार : अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई ते पोलीस आयुक्त पुणे शहर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!