“तर महाराष्ट्राचा हा आक्रोश लोक बॅलेट बॉक्समधून तुम्हाला दाखवतील…!” सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल

301 0

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आज पुण्यामध्ये कडकडीत बंद पाण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील डेक्कन मधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून लाल महाल पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये भाजपाचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले असून, त्यांच्यासह शिवप्रेमींनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात केली होती. पुण्यातील या बंदमध्ये विरोधी पक्षातील नेते देखील सहभागी झाले आहेत.

लालाल महाल येथील सभेमध्ये शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी देखील हजेरी लावून विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.

Share This News
error: Content is protected !!