पुण्यातील बंद आणि मोर्चा बेकायदेशीर; गुणरत्न सदावर्ते यांनी केली उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी

455 0

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वादंग निर्माण झाला आहे. गेली अनेक दिवसापासून हा वादंग सुरू असतानाच, अद्याप देखील त्यांचे निलंबन करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी जोर धरते आहे.

याच प्रमुख मागणीसाठी आज पुणे बंद करून मूक मोर्चा काढण्यात आला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तर लाल महाल येथे एका विराट सभेमध्ये या मोर्चाचे रूपांतर झाले आहे. या मोर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक शिवप्रेमींनी हजेरी लावली आहे. परंतु पुण्यातील हा बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगून उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Share This News
error: Content is protected !!