पुणे : ‘चांगल्या हवेचे शहर’ अशी काही वर्षांपूर्वी असलेली पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे.पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदवण्यात आला असून प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचं नावदेखील जोडलं गेलं आहे.
पुण्यात सगल आठवडाभर हवेची गुणवत्ता ‘वाईट’ नोंदवण्यात आली.शिवाजीनगर आणि भूमकर चौक परिसर ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदवण्यात आला होता. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणात झपाट्याने वाढ होत असल्याने वायू प्रदूषणामुळे हवेतील विषारी घटक प्राणघातक पातळीपर्यंत वाढले आहेत.नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमअंतर्गत पुण्यातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सलग दोन वर्षे हिवाळ्यातील वायू प्रदूषण चिंताजनक बनत चाललं आहे. गेल्या आठवडाभरात वातावरणात चढ-उतार सुरू असून वारे संथावले आहे. एरवी हवेत जाऊन विरळ होणारे सूक्ष्म धूलिकण हवेतच रेंगाळल्याने गुणवत्ता ढासळली आहे.