“मै मानता ही नही हु कि मै राज्यपाल हु…!” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

282 0

पुणे : सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे संकटात आले आहेत. दरम्यान पुण्यामध्ये एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांच्या एका वक्तव्यामुळे उपस्थित त्यांच्या वया उंचावल्या आहेत.

पुण्यात एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना भाषण सुरू होताच एका महिलेने कोश्यारी यांना थांबवत “राज्यपाल जी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत” असे म्हटले. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी “मै मानता ही नही हु कि मे राज्यपाल हु… आप जैसा बोलोगी वैसा करूँगा.., बोलो ! असं वक्तव्य केलं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला… तर काही जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यांचे वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यपाल हे आपल्या नवीन वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!