महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकर संघटनेची पुणे पोलिसांकडे तक्रार

345 0

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह शब्दोचारांमुळे महाराष्ट्राचे वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले त्यामुळे महापुरुषांचा अपमान झाला आहे. जनभावना दुखावले आहे.

या प्रकरणी पुण्यातील सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकर या संघटनेने पुणे पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. पुणे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे ही तक्रार देण्यात आली असून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!