पुणे पुन्हा हादरले : लव्ह ट्रँगलमधून तळजाई टेकडीवर तरुणाची हत्या

532 0

पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. तळजाई टेकडीवर एका 19 वर्षे तरुणाची चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या हत्याकांडामध्ये तीन मित्रांनी साहिल कसबे या 19 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासात राज वाघमारे डेबिया उर्फ तुषार आरणे आणि त्यांचा एक साथीदार करण उर्फ सोन्या वाघमारे फरार यांना ताब्यात घेतला आहे.

या तिघांच्या एका ओळखीतल्या व्यक्तीने “साहिल माझ्या मैत्रिणी सोबत फिरतो, तुम्ही त्याला बोलावून घ्या आणि कानाखाली आवाज काढा…” असे सांगितले होते.

गुरुवारी सायंकाळी साहिल आपल्या मैत्रिणी सोबत असताना या तिघांनी साहिलला घेरले त्याला बेदम मारहाण केली, आणि त्यानंतर त्याच्यावर चाकून प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये साहिलचा मृत्यू झाला आहे यामधील दोघा जणांना सहकार नगर पोलिसांनी ताब्यात घेतला असून एक जण फरार आहे अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!