पंकजा मुंढे आणी धनंजय मुंढे यांचा फोटो एकाच बॅनरवर? परळीतील या निवडणुकीसाठी … !

423 0

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो एकाच बॅनरवर आल्यामुळे नवीन चर्चेला विषय मिळाला आहे. दरम्यान पंकजा मुंडे भाजपमध्ये अनेक वर्षांपासून नाराज आहेत. त्यामुळे या बहिण भावंडांचे फोटो एका बॅनरवर आल्यामुळे त्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहता वेगळा विषय चर्चिला जातो आहे.

हे बॅनर आहे परळीतील नाथरा ग्रामपंचायत निवडणुकीचे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने त्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक एकत्र आले असून, पहिल्यांदाच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो एकत्रित छापण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता एक सरपंच आणि एका सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!