Breaking News

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंची घेतली भेट

287 0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आज अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे पुण्यातील मनसेच्या कोअर कमिटीवर नाराज आहेत. त्यात नुकताच वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांनी पक्षाला जय महाराष्ष्ट्र म्हंटले आहे.

त्यानंतर वसंत मोरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. स्वतः अजित पवार यांनी देखील तात्या केव्हा येता … ! अशी खुली राष्ट्रवादीची ऑफर देखील दिली. परंतु पक्षासोबत बेईमानी नाही अशीच भूमिका नेहमी वसंत मोरे यांनी घेतली आहे.

दरम्यान आता अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली हे लवकरच स्पष्ट होईल.

Share This News
error: Content is protected !!