Breaking News

आखाती देशात यंदा प्रथमच महाराष्ट्राची लोककला; दुबईमध्ये 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय लावणी महोत्सव

341 0

पुणे : आखाती देशात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृती व लोककलेची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी यंदा आखाती देशात प्रथमच लावणी महोत्सवाचे दुबई येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन केले आहे. महाराष्ट्राची लोककला, संस्कृती व शान “लावणी” आखाती मराठी व आंतराष्ट्रीय प्रेक्षकापर्यंत पोहचविण्यासाठी ईन्स्पायर इव्हेंट्सच्या वतीने या विशेष महोत्सवाचे आयोजन केले आहे.

आखातातील मराठी मंडळींचे आपली संस्कृती विषयक प्रेम व आदर पाहून सर्व स्थानिक कलावंताना या कार्यक्रमाच्या दरम्यान लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचे खास मार्गदर्शन लाभणार आहेत. लावणी महोत्सवात यूएईतील स्थानिक कलावंत लावणी व सवाल-जवाब यासारखे सांस्कृतिक नृत्य प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करणार आहेत.
दुबई येथील सागर जाधव ( एस.जे.लाईव) हे हा कार्यक्रम जगातील सर्व ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत एफबी लाईव माध्यमातून पोहोचविणार आहेत. वरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक चंद्रशेखर जाधव व त्यांचे सर्व सहकारी अथक मेहनत घेऊन भव्य व आदर्श असा आंतरराष्ट्रीय लावणी महोत्सव आयोजित करून अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकविणार आहेत.

यूएई येथील स्थानिक मराठी प्रेक्षकांना लाभलेली ही सुवर्ण पर्वणी आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची माहिती सर्व मित्र मंडळीना शेअर करावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Share This News
error: Content is protected !!