Breaking News

मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

347 0

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली. यावर आता केंद्रानेच मध्यस्थी करावी अशी मागणी महाराष्ट्राच्या खासदारांनी केली. कर्नाटक कडून सातत्याने उगारल्या जाणाऱ्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण तापले असतानाच, आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामध्ये मध्यस्थी करणार आहेत अशी माहिती मिळते आहे.

14 डिसेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी अमित शहा स्वतः चर्चा करणार आहेत. त्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील ते चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

See the source image

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर अमित शहा यांनी या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना कर्नाटक सरकारकडून मात्र आडमुठे धोरण अवलंबले जात आहे. कर्नाटक सरकारच्या या हेखेखोर भूमिकेबाबत देखील स्वतः अमित शहा कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करतील असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!