Breaking News

राजस्थान : जोधपूरमध्ये लग्नमंडपात 5 गॅस सिलेंडरचा स्फोट; नावरदेवासह वऱ्हाडी जखमी, 4 जणांचा मृत्यू

242 0

राजस्थान : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक भीषण आगीची घटना घडली आहे. दुर्दैवाने एका लग्न सोहळ्यामध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामध्ये चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या घोरपडले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जोधपुरमधील भुंगरा या गावामध्ये एका लग्नाची तयारी सुरू होती. या लग्न सोहळ्यामध्ये गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे लग्न मंडपातील वऱ्हाडी मंडळी या आगीत होरपळले आहेत. गंभीररित्या भाजलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते आहे.

या घटनेतील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. तर मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. एकावेळी पाच गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही भीषण आग लागली दुर्दैवाने जखमींमध्ये नवरदेव आणि त्याच्या वडिलांचा देखील समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!