Breaking News

उदयनराजेंसह ‘हे’ खासदार आज घेणार पंतप्रधानांची भेट; राज्यपालांचे निलंबन आणि सीमावाद प्रश्नावर महत्त्वाची बैठक

265 0

नवी दिल्ली : महाराष्ट्रमध्ये सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रश्न पेटलेला आहे. परंतु या बिकट समस्यांसमोर समोर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यास देखील महाराष्ट्र विसरू शकणार नाही. उदयनराजेंनी राज्यपालांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत आज थेट दिल्ली देखील गाठली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उदयनराजे यांच्यासोबत धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर हे खासदार देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत चर्चा करणार आहेत.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबाबत त्यांची हकालपट्टी केली जावी यासह सीमा वादाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली अरेरावीची भाषा थोपवण्यात यावी या प्रमुख मागण्यांवर आज उदयनराजे, धनंजय महाडिक, अनिल बोंडे पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!