Breaking News

आजच्या नाश्त्यासाठी खास रेसिपी; हिवाळ्यामध्ये भरपूर एनर्जी आणि प्रोटीनयुक्त ‘डाळींचा डोसा’

352 0

हिवाळ्यामध्ये भरपूर एनर्जी आणि प्रोटीनयुक्त आहार शरीराला मिळणे आवश्यक असते. यासाठी गृहिणी अनेक पदार्थ बनावट असतात. त्यात हा डाळींपासून बनवलेला डोसा हा देखील सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला उत्तम आणि स्वादिष्ट पर्याय आहे.

साहित्य : १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग , अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि ७ ते ८ बदाम , आले , लसूण ५ पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरे

कृती : १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग , अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि ७ ते ८ बदाम हे सर्व पदार्थ धुवून ५ ते ६ तास भिजत ठेवा. त्यानंतर हे सर्व जिन्नस उपसून घेऊन मिक्सर मधून बारीक करून घ्या. यात आता आले , लसूण ५ पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरे मिक्सर मधून बारीक करून घालावे. चवीनुसार मीठ घालावे. आता हे मिश्रण अर्धा तास ठेवा.

आता अर्धा तासाने छान डोसे घालून ओल्या नारळाची चटणी किंवा टोमॅटोच्या चटणी सोबत सर्व करा. हिवाळ्यात हा सर्वात पौष्टिक नाश्ता आहे.

Share This News
error: Content is protected !!