RASHIBHAVISHY

कन्या रास सावध रहा ! तुमच्या वाईट सवयींमुळे वाईट घटना घडू शकते…वाचा तुमचे राशी भविष्य

765 0

मेष रास : आज मेष राशीसाठी मनासारखे जगण्याचा दिवस आहे आज ऑफिस मधून वेळेत बाहेर पडाल.  शनिवार रविवार कुटुंबीयांसोबत छान घालवण्यासाठी सहलीचा बेत आखाल.

वृषभ रास : काही दिवसापासून आरोग्याच्या जाणवणाऱ्या कुरबुरी हळूहळू कमी होतील. योग्य जेवणाच्या आणि औषध ,पथ्यांच्या वेळा पाळाच, निवांत जगावे वाटेल.

मिथुन रास : आज तुम्ही तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात, तुम्ही जर जेष्ठ पती-पत्नी असाल तर जोडीदाराच्या जुन्या आठवणींमध्ये रमून जाल, मित्र-मैत्रिणींना भेटण्याची इच्छा होईल.

कर्क रास : आज तुमचे आरोग्य ठणठणीत राहणार आहे. शारीरिक आरोग्य सह मनाचे आरोग्य देखील उत्तम राहील त्यामुळे दिवसभरात येणारे संकट देखील त्यासमोर किरकोळ असणार आहे.

सिंह रास : आज तुम्हाला तुमचे उधारी चुकती करावी लागेल. सकारात्मक विचार ठेवा. मनाची चलबिचल होऊ शकते. जुनी उधारी वसूल होऊ शकते ,पण तुम्हाला तुमची उधारी देखील परत करावी लागणार आहे.

कन्या रास : आज थोडे सावध रहा, तुमच्या वाईट सवयीन विषयी थोडे आत्मचिंतन करा. एखादा बिकट प्रसंग ओढाऊ शकतो. त्यामुळे या वाईट सवयींना सोडण्याचा प्रयत्न करा.

तुळ रास : शारीरिक आणि मानसिक श्रमातून आज तुम्ही थकून जाणार आहात. सातत्याने जे काम करत आहात त्याचा वीट येईल. काहीतरी वेगळं करावं वाटेल, पण रोजचे काम थांबवता येणार नाही. त्यामुळे मरगळ झटकून कामाकडे लक्ष द्या. अधून मधून आराम करू शकता.

वृश्चिक रास : आज आनंदाचा दिवस आहे. दिवस छान जाईल कुटुंब मित्र परिवारासोबत बाहेर पार्टीला जाण्याचा बेताखाल आरोग्याच्या ज्या कुरबुरी जाणवत होत्या त्या देखील संपून जातील.

धनु रास : आज विद्यार्थ्यांसाठी आणि जे नोकरी शोधत आहे त्यांच्यासाठी चांगला दिवस आहे विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल मार्ग सापडतील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल मनासारखा दिवस.

मकर रास : मनावर कोणत्यातरी ताणतणावाचे सावट आहे पण आला दिवस जातो हे लक्षात ठेवा उद्याचा दिवस चांगला असेल असा सकारात्मक विचार करा आणि स्वतःला कामात व्यस्त ठेवा.

कुंभ रास : आज तुम्ही स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष देणार आहात घरातील काम ऑफिसचे काम कुटुंब यामध्ये नेहमी व्यस्त राहणारे तुम्ही आज स्वतःकडे लक्ष द्याल.

मीन रास : आज कशाची तरी भीती तुमच्या मनात कायम राहील तुमच्यातील परमात्मा तुम्हाला कसले तरी संकटाचे संकेत देत आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करा.

Share This News
error: Content is protected !!