नाशिक : नाशिकमध्ये बसचा पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसने पेट घेतला. या अपघातामध्ये पाच जणांना आपला जीव देखील गमवावा लागल्या असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नाशिक सिन्नर महामार्गावर शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या बसने काही दुचाकीस्वारांना चिरडले देखील आहे आणि त्यानंतर बसने पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकी स्वारांसह या बसने एका समोरून येणाऱ्या बसला देखील जोरदार धडक दिली असल्याचे समजते. या अपघातामध्ये दुचाकी स्वरांचा मृत्यू झाला असून बसमधील काही प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार, आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी अक्षरशः आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या देखील मारल्या असल्याचे समजते.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.