मुंबई : संतापजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोशारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणातून सुटण्याची चिन्हे नसतानाच आणखीन एक नवीन संकट त्यांनी पुन्हा ओढवून घेतले आहे. नुकताच मनसे नेते मनोज चव्हाण यांनी एक फोटो ट्विट करून नवीन प्रश्न उपस्थित केला आहे पाहूयात हे ट्विट…
ठीकाण राजभवनही बाई कोण ?
अभिनेत्री आणि माॅडेल राजभवनात काय करतेय ?राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही ?@mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/gmhQWiO3KN— Manoj B Chavan waterman (@ManojBChavan5) December 7, 2022
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी पोस्ट केलेला फोटो आहे मायरा मिश्रा या मॉडेलचा… मायरा मिश्रा या मॉडेलने राजभवनामध्ये राज्यपालांच्या खुर्चीवर रेलून उभे राहून एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे. त्यासह एक फोटो खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत देखील आहे.
यावरूनच चव्हाण यांनी या फोटोसह कॅप्शन लिहिले आहे की, “ठिकाण राजभवन… ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करते?राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन संकट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओढावून घेतले आहे.