आज सकाळपासूनच गुजरात आणि हिमाचलप्रदेश या दोन राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचा धुरळा सुरू आहे. गुजरात मधील आणि हिमाचल प्रदेश मधील एकंदरीत चित्र स्पष्ट होऊ लागले असतानाच भाजपने आपला प्लॅन बी हिमाचल प्रदेशसाठी ऍक्टिव्ह केले आहे. या प्लॅन बीचे सूत्रधार असणार आहेत खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
गुजरातमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपने चांगली कामगिरी केली आहे. गुजरात विधानसभेत भाजप 182 पैकी 150 जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळते आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप 27 तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर असल्यामुळे भाजपच्या प्लॅन बी नुसार देवेंद्र फडणवीस यांनी हिमाचल प्रदेशकडे कुच केले आहे.
काय आहे हिमाचल प्रदेशसाठी भाजपचा प्लॅन B
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला चांगलीच लढत दिली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये जागा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करण्यासाठी आता अपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करता येऊ शकतो. अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याकारणानेच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासह विनोद तावडे हे भाजपचे नेते हिमाचलकडे रवाना झाले आहे.