हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

212 0

संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशात अपक्षांची भूमिका किंगमेकर ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून आतापर्यंत 34 जागांवर भाजपा 31 जागांवर काँग्रेस तर तीन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

या सगळ्या राजकीय स्थितीमध्ये आता भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमल्यात दाखल झाले आहेत. दरम्यान आता गुजरात बरोबर हिमाचल ची सत्ता देखील भाजपा राखणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!