कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचे संजय राऊतांना आव्हान; “हिम्मत असेल तर बेळगावमध्ये या, नाहीतर आम्ही तिकडे येतो…!

400 0

बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता पूर्णपणे विकोपाला गेला असल्याचीच चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकंदरीत परिस्थिती पाहता मला आता बेळगावला जावं लागेल, असे भाष्य केले होते. यावर आता संजय राऊत यांनी देखील शरद पवार यांच्या वक्तव्याला दुजोरा देऊन दिला होता. पण हे शांत होण्याचे नाव घेत नाही.

संजय राऊत यांना आता थेट कन्नड रक्षण वेदिकेचा कार्यकर्त्यांनीच धमकी दिली आहे. “हिम्मत असेल तर बेळगावमध्ये या नाहीतर आम्ही तिकडे येतो” असा थेट इशारा संजय राऊत यांना देण्यात आला. महाराष्ट्रात आलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसला काळेफासून त्यावर महाराष्ट्राचे स्टिकर लावल्याप्रकरणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी असा इशारा दिला आहे.

हा वाद विकोपाला गेला असतानाच आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेते हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!