Sanjay Raut : “मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ…!”, संजय राऊतांच्या शंभूराज देसाईंना सवाल

251 0

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर राज्य सरकारवर ताशेरे ओढत असताना संजय राऊत यांनी सरकारला थेट षंढ असल्याचे म्हटले आहे. यावरून शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना, संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते असा थेट इशाराच दिला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादबाबत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक आरोप करत आहेत. त्यांनी आपले तोंड आवरावे, तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहात. बाहेरचं वातावरण तुम्हाला सूट होत नाही. असे तुमच्या बडबडण्यावरून वाटते. अशी खरमरीत टीका शंभूराजे देसाई यांनी केली होती.

यावर संजय राऊत यांनी देखील ट्विट करून प्रत्युत्तर करताना म्हटले आहे की, शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटक आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा कायदा, न्यायालय, तपास यंत्रणा खिशात आहेत. असेच शंभूराज देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का ? मी तयार आहे अशा भाषेत जाहीर आव्हानच दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!