BIG BREAKING : आकुर्डीतील अगरबत्ती कंपनीला भीषण आग; कंपनीलगत असलेल्या शाळेतील 400 विद्यार्थ्यांना सुखरूप ठिकाणी हलवले; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

436 0

पिंपरी-चिंचवड : आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकरनगर आकुर्डी येथील एका अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आज एवढी भीषण होती की, आगीने क्षणार्धात आपले तांडव सुरू केले आणि यामध्ये कारखान्याला लागून असलेल्या शाळेच्या भिंतीला देखील याची झळ लागली. त्यामुळे शाळेतील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना तातडीने शाळेबाहेर काढण्यात आले.

त्याचबरोबर या अगरबत्ती कंपनीच्या आजूबाजूला असणाऱ्या पत्रा शेडच्या काही घरांना देखील झळ लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शाळेजवळ भीषण आग लागली असल्याची माहिती मिळताच पालकांनी देखील तातडीने धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप देखील या आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवता आले नाहीये. या आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून, पालक आणि बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. प्रचंड प्रमाणात लागलेल्या या आगीने आणि घरांचे झालेले नुकसान पाहता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही आग नक्की कशाने लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

Share This News
error: Content is protected !!