Union Minister Raosaheb Danve : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; ‘त्या’ व्हिडिओ बाबत दानवेंचे स्पष्टीकरण

277 0

जालना : एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. आजपर्यंत सातत्याने ज्या मंत्र्यांनी महाराजांचा अपमान केला, त्या मंत्र्यांविषयी देखील महाराष्ट्रात संतापाची लाट उठते आहे. या लाटेमध्ये आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील लोटले जात असतानाच तो व्हिडिओ मात्र दोन वर्षांपूर्वीचा असल्याचं स्पष्ट झाल आहे.

रविवारी सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. परंतु हा व्हिडिओ जुना असून याविषयी मी माफी देखील मागितली होती. तो उल्लेख माझ्याकडून अनावधानाने झाला होता. त्यानंतर माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा देखील पडला. पण सध्याच्या लाटेमध्ये हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे याचेच स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!