सिंहगड रोड परिसरातील बुद्ध विहार समोर ड्रेनेज लाईन तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित; नागरिक हैराण

537 0

पुणे : पानमळा वसाहत सिंहगड रोड येथील आम्रपाली बुद्ध विहार समोर ड्रेनेज लाईन सातत्याने तुंबून परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे. त्यासह परिसरातील नागरिकांमध्ये अनारोग्य देखील पसरते आहे. दुर्गंधीयुक्त मैमिश्रित पाण्यामुळे नागरिक ट्रस्ट झाले आहेत.

महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना फोटो सहित तक्रारी करून देखील ते कर्मचारी आणि अधिकारी जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता तक्रार घेऊन जायचं कोणाकडे असा प्रश्न माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांच्या प्राथमिक गरज देखील पूर्ण करण्यात प्रशासन कमी पडते आहे. सातत्याने तक्रार करून देखील या सामान्य समस्येला मोठे होण्याची वाट का पहिली जाते आहे? असा सव्वाल उपस्थित होतो आहे. या समस्येवर आता कायमचा तोडगा काढला जावा अशी नागरिकांची मागणी आहे.

Share This News
error: Content is protected !!