महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता ?” दीपक केसरकर यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल

389 0

कोल्हापूर : कर्नाटक सरकारने नुकतेच महाराष्ट्राला पत्र पाठवून बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पाऊल ठेवून नये असा धमकी वजा इशारा दिला आहे. एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चाललेला असताना “अद्याप देखील महाराष्ट्राने सामोपचाराची भूमिका घेतली आहे. त्यांनी अविचाराने निर्णय घेतला तर तसाच आपणही घेणे हे योग्य नाही. सामोपचाराने प्रश्न सुटले पाहिजेत अशी आमची इच्छा असल्याचं केसरकर म्हणाले आहेत. तथापि तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? महाराष्ट्रात आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबईत आणि राज्यात येण्यास बंदी करू शकतो पण तसे आम्ही करणार नाही. अशी परखड भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली आहे.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना दीपक केसरकर म्हणाले की, “कोणत्याही धरणाचे पाणी सोडले की प्रश्न सुटत नाहीत. पाणी योजनेसाठी दोन हजार कोटी महाराष्ट्रन दिले आहेत. कर्नाटक कडून सीमा भागातील नागरिकांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कर्नाटक त्यांच्या लोकांना बहुभाषा सुविधा देखील देऊ शकले नाहीत. न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल हा आमचा विश्वास आहे. तुमच्याकडे रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करतात असा थेट हल्लाबोल दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारवर केला आहे.

Share This News
error: Content is protected !!