पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आत्तापर्यंत अनेक गुन्हेगार आणि टोळक्यांवर जबरदस्त कारवाईचा बडगा उभारला आहे. मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील योगेश नागपुरे आणि टोळीतील सहा जणांवर मोका अंतर्गत करण्यात आलेली ही 112 वी कारवाई आहे.
यामध्ये मुंढवा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपी योगेश नागपुरे यांच्यासह टोळीतील प्रमोद साळुंखे, वाजिद सय्यद, मंगेश तांबे, लक्ष्मण सिंह उर्फ हनुमंता तोवर आणि एका महिलेचा समावेश आहे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या आरोपींनी संघटितपणे दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे गुन्हे केले आहेत त्याच्यावर आतापर्यंत अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 च्या कलम 3(1)(ii),3(2),3(4) या कलमांचा अंतर्भाव करण्याकामी मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पोलीस उपायुक्त परिभ्रमण पाच पुणे शहर आणि विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त पुढे प्रादेशिक विभाग पुणे शहर नामदेव चव्हाण यांना प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार पुढे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 112 वी कारवाई आहे.