रायगड : “तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं… !” उदयनराजे संतापले

373 0

रायगड : आज उदयनराजे भोसले यांचा रायगडावर “निर्धार शिवसन्मानाचा” मेळावा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असतानाच उदयनराजे भोसले यांनी देखील कठोर भूमिका घेतली आहे. यावेळी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपवर ताशेरे ओढत राज्यपाल यांची उचल बांगडी होत नाही. तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. सर्वच पक्षांनी सोयीनुसार महाराजांचे नाव वापरणे सुरू केले आहे. यापुढे हे चालणार नाही राज्यपाल भगतसिंह कोसरी हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करतात त्यामुळे राज्यात जातीय विषमता पसरवत असल्याचे देखील उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे

तसेच यावेळी चित्रपट आणि लेखक देखील इतिहासाचे मोडतोड करतात नुकताच महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांवर असलेल्या चित्रपटांवर मोठा वादंग उभा राहिला होता त्यावरून त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!