पुणे : हडपसर येथे BRT रोडमध्ये लक्झरी बस आणि PMT बसचा समोरा समोर आहे. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर गंभीर जखमी आहेत. सुदैवाने मोठी जीवित हानी टाळली असुवुन काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, आज पहाटे 4:30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. BRT रोडमध्ये लक्झरी बस आणि PMT बसचा समोरा समोर धडकल्या आहेत. किरकोळ प्रवासी जखमी झाले असून दोन्हीही वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर क्रेनने गाड्या काढल्या आहेत. पहाटेची वेळ असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला नाही. ट्रॅफीक सुरळीत आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            