महाराष्ट्रातील मंत्री बेळगावमध्ये आले तर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; कर्नाटक सरकारचे महाराष्ट्राला पत्रं !

239 0

बेंगळुरू : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होताना दिसतो आहे. कोणताही तोडगा निघण्याऐवजी कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर हवी होताना दिसते आहे. कारण तसे थेट पत्रचं कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पाठवलं आहे.

या पात्रात लिहिले आहे कि, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असा थेट इशाराच कर्नाटक सरकारने दिला आहे.

महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री डिसेंबर 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हे पत्रं पाठवलं असल्याचे बोलले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!