पगार मागितल्यानं मालकाचं कामगारासोबत धक्कादायक कृत्य; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद VIDEO

434 0

मुंबई : कळंबोलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कामगाराने पैसे मागितल्याचा राग आल्यानं दुकानदाराने कामगारासोबत धक्कादायक कृत्य केलं. हे कृत्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

पगाराचे राहिलेले पैसे मागितल्याच्या रागातून दुकान मालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने कामगारावर हल्ला केला. या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला आहे. या कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छोटू रामसागर राय असं या घटनेतील पीडित कामगाराचं नाव आहे. दरम्यान मारहाण प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

Share This News
error: Content is protected !!