सावधान ! राज्यासह पुण्यात गोवरचा धोका वाढतोय; डॉक्टरांनी काय दिला सल्ला ? पाहा

230 0

पुणे : मुंबई पाठोपाठ आता पुण्यासह राज्यात गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवर हा कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरत आहे. गोवर लस न घेण्यामुळे आणि गैरसमजुतीमुळे लशीपासून अनेक मुलं वंचित असल्याने राज्यात 34 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, धुळ्यासह राज्यातील अनेक शहरात गोवरच्या साथीमुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सर्वाधिक धोका नवजात बालकांपासून 5 वर्षे वयाच्या मुलांना आहे. आतापर्यंत गोवरचे 15 पैकी 14 मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.लहान बालकांसह मोठ्यांना देखील गोवरची लागण होत आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे गोवरची लस 99 टक्के सुरक्षित असून कोरोनाच्या तुलनेत गोवरचा धोका कमी आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.ज्या बालकांना लस देण्यात आलेली नाही, अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते.

गोवरची लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्त तपासणी करून रोगाचं निदान झाल्यावर लगेचच औषधं सुरू करा.

Share This News
error: Content is protected !!