दौंडच्या बहुचर्चित ॲट्रॉसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याला राजस्थानमधून अटक

658 0

पुणे : दौंड मधील ॲट्रॉसिटी आणि मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याला राजस्थानच्या अजमेर मधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

संबंधित प्रकरणातील महिलेने माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह 20 जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करणे विनयभंग असे गुन्हे दाखल केले होते. माजी नगराध्यक्षाच्या विरुद्ध हे गुन्हे दाखल झाल्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर बादशहा शेख यांचा जामीन अर्ज देखील बारामती सत्र न्यायालयाने फेटाळला होता. तेव्हापासून पोलीस बादशहा शेख यांच्या मागावर होते.

याबाबत अद्याप सविस्तर वृत्त हाती लागले नसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानच्या अजमेर मधून बादशहा शेख याला ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Share This News
error: Content is protected !!