मोठी बातमी : रिक्षा संघटनांचे आंदोलन अस्त्र मागे; आज घेणार राज ठाकरेंची भेट

347 0

पुणे : बेकायदेशीर बाईक आणि टॅक्सीच्या विरोधात सोमवारी रिक्षा संघटनांनी मोठे आंदोलन उभे केले. हे आंदोलन मागे घेण्यात आले असून, आज रिक्षा संघटना राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी बघतो रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, “आज आम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत आहोत. सरकार कोणाचेही असो त्यावर राज ठाकरे यांचा वचक असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि राज ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. आम्हाला आशा आहे की ते आमचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील. म्हणूनच आम्ही हे आंदोलन मागे घेतले असून पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आणि नागरिकांची देखील त्यामुळे गैरसोय होणार नाही असे ते म्हणाले आहेत.

रिक्षा संघटनांनी त्यांचे आंदोलन अस्त्र मागे घेतले असले तरीही, आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!