पुणे : रिक्षा संपमुळे शालेय विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ

357 0

पुणे : बेकायदा बाईक-टॅक्सी प्रवासी वाहतूक करणा-यांच्या विरोधात परीक्षा संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. आज पुणे आरटीओ कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनांमध्ये 40% रिक्षा शालेय विद्यार्थ्यांची देखील वाहने असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता या शालेय विद्यार्थी आणि पालकांवर तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.

या रिक्षा संपाचा सर्वाधिक फटका या शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांनाच बसणार आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे असा प्रश्न समोर असताना पीएमपी प्रशासनाने जादा बसेसचे देखील नियोजन केले असल्याचे समजते आहे. शालेय विद्यार्थ्यांसह रुग्ण, वृद्ध आणि विशेष नागरिकांना देखील या रिक्षा बंदचा मोठा फटका बसणार आहे.

संप काळामध्ये मध्यवस्तीत पीएमटीच्या साठ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाचे नियोजन असे असून त्यामुळे नागरिकांना दिलासा तर मिळाला आहे. तरी नागरिकांनी पीएमटीचा अधिक वापर करावा असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!