Breaking News

पुणेरी महिलांकडून रामदेवबाबांना साडी-चोळीचा आहेर; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महिला आक्रमक

449 0

पुणे : योग गुरु रामदेव बाबांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांकडून रामदेव बाबांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. 

त्यातच आज पुण्यात काँग्रेसच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रामदेव बाबांना पोस्टाने चक्क साडी,चोळी,टिकल्या आणि गजराचा आहेर पाठवलेला आहे आणि हे सगळं परिधान करून रामदेव बाबांनी योगासने करावी असं मत देखील मांडलेला आहे

यामध्ये काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या शहर उपाध्यक्षा ॲड. मोनिका खलाणे यांनी पुढाकार घेत रामदेव बाबांना हा आहेर पाठवत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध आज केलेला आहे.

तसेच रामदेव बाबांनी जेव्हा हे वक्तव्य केलं त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या यावेळी त्यांच्यासमोर असे वक्तव्य केल्याने अमृता फडणवीस यांना संताप का आला नाही?त्यांनी त्यांच्यासमोर महिलांचा अपमान होताना कसा सहन केला? असा सवाल देखील मोनिका खलाणे यांनी आता उपस्थित केलाय

Share This News
error: Content is protected !!