पंढरपूरकरांनी राज्य सरकारला दिला कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा, कारण…

323 0

पंढरपूर : पंढरपूर कॉरिडोरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवत कर्नाटकमध्ये जाण्याचा महाराष्ट्र सरकारला इशारा दिलाय. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमद्वाराजवळ नागरिकांनी लाक्षणिक उपोषणही केलं.

पंढरपूर कॉरिडोरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा निर्धार पंढरपूरकरांनी केलाय. कॉरिडोरला पंढरपूरकर तीव्र विरोध दर्शवत आहेत. राज्य सरकारने दखल न घेतल्यास कर्नाटकमध्ये जाण्याचा इशाराही पंढरपूरकरांनी दिलाय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमद्वाराजवळ नागरिकांनी लाक्षणिक उपोषण करत कॉरिडोरला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!