Ajit Pawar : “पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात हे ऐकून हतबल झालो…!”

427 0

मुंबई : पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं? आम्ही हतबल झालो असे ऐकून ! अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मिरगाव येथील शिवनीका संस्थांच्या इशान्येश्वर मंदिरात हजेरी लावली. या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी इशान्येश्वर मंदिरातील भविष्यकाराकडून भविष्य देखील पाहिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो, तेव्हा दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. एकविसाव्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. काय बोलावं. आम्ही हतबल झालो ऐकून. अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!