Breaking News

MLA Pratap Sarnaik : “मुलं आणि सुनांच व्यवस्थित होऊ दे..”, तुळजाभवानी मातेला 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देऊन फेडला नवस

647 3

उस्मानाबाद : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीला 75 तोळे सोनं अर्पण केल आहे. यामध्ये 51 तोळ्याच्या सोन्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार त्यांनी देवीला अर्पण केला आहे.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की “मुलं सुनांवर लक्ष ठेव, त्यांच व्यवस्थित होऊ दे असं साकडं मी देवीला घातलं होतं. त्या दोघांचं चांगलं झालं आहे. त्यांचं लग्न सुरळीत पार पडलं, नातवंडही झाले. त्यासाठी नवस फेडण्यासाठी आलो आहे. असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेला 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देण्याचं कारण घातलं होतं तो नवस आज फेडल्याच त्यांनी सांगितलं.

दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या मागे ED हात धुवून लागली आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात केस सुरू आहेत. न्यायालयीन लढाई लढत आहे. मी शिंदे गटात आलो आहे. भाजपसोबत आलो आहे म्हणून माझं संकट दूर झालं असं नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!