CRIME NEWS : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण! 32 आरोपींवर मोक्का

475 0

कल्याण : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील सर्व 32 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यातील आरोपी पंढरीनाथ फडके आणि माजी नगरसेवक कुणाल पाटील यांना मोठा झटका बसला आहे.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर मोठा दबाव असून पोलिस संपूर्णपणे एकतर्फी तपास करत असल्याचा आरोप पंढरीनाथ फडके यांच्या वकिलांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!