SHRADDHA WALKAR CASE : आफताबने न्यायालयात अखेर मान्य केलं, “जे काही घडलं ती Heat of the Moment होती…!”

564 0

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. अत्यंत शांत डोक्याने आफताब पुनावाला या तिच्या लिव्ह पार्टनरने तिची क्रूरतेने हत्या केली. तिचे तुकडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. त्याच्या विरुद्ध आता तपास यंत्रणा पुरावे जमा करण्याचे काम करते आहे.

दरम्यान न्यायालयामध्ये आफताब पुनावाला याला हजर करण्यात आले. यावेळी त्याने आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची कबुली दिली आहे. ‘रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं की हीट ऑफ द मोमेंट होती.’ अस त्याने न्यायालयात कबुल केल आहे. आफताबने कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!