इंडोनेशियात भूकंपाचे तीव्र धक्के; 400 हून अधिक जखमी; 70 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

413 0

इंडोनेशिया : सोमवारी इंडोनेशियामध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे हाहाकार उडाला आहे.५.६ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने अनेक भागांमध्ये इमारती अक्षरशः हलू लागल्या होत्या. दरम्यान इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतामध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले असून, पश्चिम जावा येथील चिआनजूर या गावामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते.

चिआनजूरमध्ये इमारती कोसळल्या, या इमारतींच्या मलब्याच्या ढिगार्‍याखाली अडकल्याने 70 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. अनेक जण या ठिकाणी अडकले असून बचाव कार्य सुरू आहे. अचानक भूकंपाचे तीव्र धक्के जाणवू लागले. त्यानंतर इमारती घर आणि कार्यालयांमधील फर्निचर देखील हदरत होते. नागरिकांनी तातडीने इमारतींच्या बाहेर पळ काढला.

दरम्यान या भूकंपांच्या धक्क्यांमुळे सुनामीची भीती नाही असे स्पष्टीकरण हवामान विभागाने दिल्याने दिलासा आहे. तथापि नागरिकांनी काळजी घ्यावी, तर इमारतींपासून काही दिवस दूर राहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने या नागरिकांना तात्पुरते इतरत्र स्थलांतरित होण्याची व्यवस्था देखील केली आहे.

Share This News
error: Content is protected !!