धक्कादायक : ब्रेक फेल झाल्यामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे झाला नवले ब्रिजवरील अपघाताचा थरार ! वाचा सविस्तर

770 0

पुणे : रविवारी रात्री अपघातांचा पूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला. पण हा अपघात छोटा-मोठा नाही, तर तब्बल 48 वाहनांना एका टँकरने धडक दिली होती. या अपघातामध्ये सात ते आठ नागरिक जखमी झाले, तर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सांगितले जात होते की, या टँकरचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. परंतु आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या चालकाने पुलावर उतार असल्याकारणाने इंजिन बंद केलं होतं. आणि गेअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता. वेळेवर ब्रेक दाबून न शकल्यामुळे त्यानं तब्बल 48 गाड्यांना जबर धडक दिली आहे.

TOP NEWS MARATHI LIVE : पुण्यातील नवले पूलावर भीषण अपघात, कंटेनरनं 30हून अधिक गाड्यांना दिली धडक; पाहा…थेट घटनास्थळावरून LIVE

हा अपघात झाल्यानंतर या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला मनीराम छोटेलाल यादव असे या चालकाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!